TOP 50 Maharashtra Superfast News: सुपरफास्ट बातम्या : 19 Oct 2025 : ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप केले आहेत, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरून राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. 'मोदींचं सरकार आल्यापासून निवडणूक आयोगाचे कार्यालय भाजपचे झालेत, तिथूनच भाजपचेही कामकाज चालतं,' असा थेट आरोप नाना पटोले यांनी केला आहे. याशिवाय, पर्याय नसल्यामुळेच राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याची टीका मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी केली आहे. दुसरीकडे, चिपळूणमध्ये मंत्री उदय सामंत यांनी मित्रपक्षांना इशारा दिला आहे, तर धाराशिवमध्ये एकाच पत्त्यावर ३७ मतदार आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातला गुंड निलेश घायवळ प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होणार असून काँग्रेस नेते दिलीप माने भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement