Nana Patole on MNS : मनसेने काळे झेंडे दाखवल्यास त्यांना गुलाबाचं फूल देऊ : Bharat Jodo Yatra
Continues below advertisement
काँग्रेसच्या भारत जोडा यात्रेचा आज विदर्भातला चौथा दिवस आहे. अकोल्यातल्या कुपट बाळापूर येथून सकाळी पदयात्रेला सुरूवात झालीेय.. आज ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या यात्रेचं वरखेड येथे स्वागत केलं जाणार आहे... दुपारी चार वाजता राहुल गांधी शेगावात गजानन महाजारांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांची साडेसहा वाजता जाहीर सभा होणार आहे. दरम्यान या सभेत राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान मनसे आम्हाला काळे झेंडे दाखवत असेल तर आम्ही त्यांना गुलाबाचं फुल देऊ असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मनसेवर निशाणा साधलाय. दरम्यान त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी
Continues below advertisement