Nana Patole on Shiv Sena NCP : मित्रपक्षाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या : नाना पटोले
Continues below advertisement
गोंदियातल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं भाजपचा हात पकडल्यानंतर नाना पटोलेंनी हायकमांडकडे तक्रार केली होती... आणि आता मुंबई महापालिकेतील वॉर्ड पुनर्रचनेवरुन नाना पटोलेंनी शिवसेनेला इशारा दिलाय.. वॉर्ड पुनर्रचनेवरुन नुकसान होणार असेल तर कोर्टात जाऊ असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे.. मित्रपक्षाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन देखील नाना पटोलेंनी केलंय.
Continues below advertisement