Nana Patole on Satyajeet Tambe : सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसला धोका दिला
Continues below advertisement
एकीकडे सत्यजीत तांबे, हे आपण अपक्ष अर्ज भरलेला असला, तरी आपण काँग्रेसचेच उमेदवार असल्याचा दावा करत आहेत... पण, त्यांच्या या सरप्राईज उमेदवारीवरुन, काँग्रेस मात्र नाराज असल्याचं दिसतंय... कारण सत्यजीत तांबे यांच्या या उमेदवारीवरुन जेव्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारलं गेलं, तेव्हा त्यांनी सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीची माहिती माध्यमांमधून कळल्याचं सांगून, काँग्रेस आणि तांबे कुटुंबामध्ये आलबेल नसल्याचे संकेत दिले... इतकंच नाही... तर सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे उमेदवार नसून, अपक्ष उमेदवार आहेत... त्यामुळे त्यांचे निर्णय त्यांनी घ्यावेत, हेही सांगायला विसरले नाहीत...
Continues below advertisement