Nana Patole on Nagpur RSS : महाराष्ट्र पोलीस सक्षम, कोणताही हल्ला होऊ देणार नाही : नाना पटोले

Continues below advertisement

नागपूर : निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. देशातील पाच राज्यातील निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असतानाच पटोले यांनी आरोप केला आहे. राज्यात जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होत असताना ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याचे राज्य निवडणूक आयोगाला सांगितले होते. मात्र, तरीही राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका लावल्या. त्यामुळे निवडणूक आयोग कोणाच्या इशाऱ्याने काम करते हे स्पष्ट असल्याचे पटोले म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram