Nana Patole New Delhi :भाजपने कितीही वाईट रणनिती केली तरी महाराष्ट्रात मविआ सरकार येईल

Continues below advertisement

Nana Patole New Delhi :भाजपने कितीही वाईट रणनिती केली तरी महाराष्ट्रात मविआ सरकार येईल 

 राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून  लागण्याची शक्यता असताना  त्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Decision)  आज अनेक मोठ्या निर्णयांची घोषणा झाली.  शिंदे सरकारने आज मुंबईत येणाऱ्या हलक्या वाहनांना टोलमाफीच निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाखो  लोकांना, मुंबईकरांना फायदा होणार आहे. ज्याप्रमाणे आमची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री शेतकरी योजना तशी मुख्यमंत्री लाडका प्रवासी योजना हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच हा निर्णय निवडणुकांपुरता नाही, पर्मनंट असल्याचे देखील ते म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर असणाऱ्या टोलनाक्यावर होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे टोलमध्ये सूटमध्ये  मिळावी अशी अनेक वर्षाची मागणी होती.मी जेव्हा आमदार होतो त्यावेळी मी आंदोलन केले होते, कोर्टात देखील गेलो.मला आज आनंद आहे की, लाखो मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे इंधन वाचेल, प्रदूषण होणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारे आहे.  हा निर्णय निवडणुकीपुरता नाही, कायमस्वरुपी आहे. सर्व कामांची पोचपावती जनता देईल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram