Nana Patole on Satyajeet Tambe : Sudhir Tambe यांनी Congress ला फसवलं, सत्यजीत तांबेंना पाठिंबा देणार
Nana Patole on Satyajeet Tambe : सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी पक्षाला फसवलं आहे. त्यामुळं नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency) काँग्रेस सत्यजीत तांबेंना (Satyajeet Tambe) पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी घेतली आहे. काल झालेल्या घडामोडींचा अहवाल हायकमांडला दिला आहे. याबाबतचा पुढील निर्णय हायकमांड घेईल. मात्र, काँग्रेस बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे नाना पटोले म्हणाले. नाना पटोले यांनी सकाळी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.