Nana Patole : काँग्रेस कार्यकर्त्यांनी संवाद साधताना जय बळीराजा म्हणावं : नाना पटोले ABP Majha
Continues below advertisement
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी फोनवर बोलताना हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याचा निर्णय जाहीर केला. मुनगंटीवारांच्या या निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले. सुधीर मुनगंटीवारांनंतर आता काँग्रेसच्या नव्या घोषणेची चर्चा आहे. मुनगंटीवारांच्या 'वंदे मातरम'च्या घोषणेनंतर आता काँग्रेसनं जय बळीराजाची घोषणा दिली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी संवाद साधताना जय बळीराजा म्हणावं, असे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. यासंदर्भात बोलताना वंदे मातरम् आमचा स्वाभिमान आहे, पण बळीराजा जगाचा पोशिंदा आहे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.
Continues below advertisement