Nana Kate on Sharad Pawar : शरद पवार पुढचा गळ चिंचवडमध्ये टाकणार, नाना काटे तुतारी फुंकणार?

Continues below advertisement

Nana Kate on Sharad Pawar : शरद पवार पुढचा गळ चिंचवडमध्ये टाकणार, नाना काटे तुतारी फुंकणार?

शरद पवार पुढचा गळ अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात अर्थात पिंपरी चिंचवडमध्ये टाकण्याच्या तयारीत आहेत. या गळात चिंचवडमधील अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे अडकण्याची शक्यता आहे. नाना यांचं जयंत पाटलांशी संवाद झाल्याची ही खात्रीलायक माहिती आहे. म्हणूनचं की नानांनी आता आगामी विधानसभा चिन्हावर लढण्याचा निश्चय केलाय. अजित दादांना ही त्यांनी आता माघार नाही, असं स्पष्टपणे कळवल्याचं समजतंय. चिंचवड विधानसभेत अश्विनी जगताप विद्यमान आमदार असल्यानं ही जागा भाजपला सुटणार हे उघड आह. म्हणूनचं नाना काटे तुतारी फुंकण्याची शक्यता आहे. तूर्तास नाना या शक्यता नाकारत आहेत, मात्र जागा घड्याळाला सुटली नाही तरी मी चिन्हावरचं ही निवडणूक लढणार असं म्हणत नानांनी संभ्रमावस्था वाढवलेली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय नाजिम मुल्ला यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram