
Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्री
Namdevshastri : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्री
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वादात अडकलेल्या मंत्री धनंजय मुंडेंनी काल भगवानगडावर धाव घेतली... त्यानंतर आता भगवानगडाचे नामदेवशास्त्री यांनी भक्कमपणे धनंजय मुंडेंची पाठराखण केलीय. नामदेवशास्त्रींनी सकाळी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंना क्लिनचीट दिलीय. मुंडे हे गुन्हेगार नाहीत हे १०० टक्के सांगू शकतो असं ते म्हणाले. मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही, भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे हे त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं. भगवानगड, नामदेवशास्त्री यांचा शब्द हा वंजारी समाजात प्रमाण मानला जातो. त्यामुळे आता एकीकडे मुंडेंच्या राजीनाम्याविषयी चहूबाजूने दबाव वाढत असताना नामदेवशास्त्रींनी घेतलेल्या भूमिकेमुळे धनंजय मुंडेंना नवसंजीवनी मिळणार का? धनंजय मुंडेंना या निमित्ताने वंजारी समाजाचं एकगठ्ठा पाठबळ मिळालंय का? बाजू भक्कम झाल्यामुळे धनंजय मुंडेंचं हे शक्तिप्रदर्शन आहे का? तसंच आता सरकारबाह्य या सामाजिक दबावापुढे सरकार झुकणार का असे सवाल उपस्थित झालेत.