Special Report Shaniwarwada : शनिवारवाड्यात नमाज पठण, खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक

Continues below advertisement
पुण्यातल्या ऐतिहासिक शनिवारवाडा (Shaniwar Wada) परिसरात नमाज पठण केल्याच्या व्हिडिओमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 'माझं पुरातत्व विभागाच्या लोकांशी बोलणं झालेलंय आणि त्यांना हे सांगितलं की यापुढे कुठल्याही मुस्लिमाला एंट्री देऊ नका', असे वक्तव्य खासदार मेधा कुलकर्णी यांनी केले आहे. आंदोलकांनी ज्या ठिकाणी नमाज पठण झाले, त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले. तसेच, जवळच्या हजरत ख्वाजा सय्यद शहा पीर मकबूल हुसेनी दर्ग्यावरील हिरवे झेंडे काढून भगवे झेंडे लावण्यात आले. दुसरीकडे, नाशिकमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी (Kumbh Mela) पुरोहितांची कमतरता भासू नये, म्हणून शासनाने आयटीआयमध्ये (ITI) 'वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट' नावाचा अल्पमुदतीचा कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola