नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट
नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट
रितेश मोर्या असे हिंदी भाषिक टीसीचे नाव असून, अमित पाटील आणि त्यांच्या पत्नी सोबत हा सर्व प्रकार रविवारी रात्री साडे आठ ते नऊच्या सुमारास नालासोपारा रेल्वे स्थानकात घडला आहे
ही घटना वसई विरार मराठी एकीकरण समितीला समजताच नालासोपारा रेल्वेस्थानाकात सोमवारी मराठी एकीकरण समितीने ठिय्या आंदोलन करून रेल्वे प्रशासनाला जाब विचारला होता.
टीसी ने रेल्वेस्थानाकात पाटील दांपत्याला तिकीट तपासणी साठी अडविले असता, त्यांना टीसी ची भाषा समजली नाही, त्यांना मराठी बोलण्यास सांगितले तर हम इंडियन है हिंदी मे बोलेंगे, रेल्वे मे मराठी नही चलेगा अशी धमकी देत त्यांना आरपीएफ कार्यालयात बसवून ठेवून, पाटील दामपत्या कडून मराठी न बोलण्याचे लेखी लिहून घेतले होते.
तर पाटील यांच्या पत्नीने काढलेला व्हिडीओ ही जबरदस्तीने डिलीट केल्याचा आरोप करण्यात आला आहे.