Nalasopara Gautami Patil : बाप्पााच्या आगमन सोहळ्यात गौतमी पाटीलचा डान्स

Continues below advertisement

Nalasopara Gautami Patil : बाप्पााच्या आगमन सोहळ्यात गौतमी पाटीलचा डान्स

ही बातमी पण वाचा

Women Health : महिलांनो..तुम्ही निरोगी तर कुटुंबही निरोगी राहील, Breast, गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी 'या' चाचण्या अवश्य करा

Women Health : सध्या बदलत्या काळानुसार महिलाही आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरीनिमित्त घराबाहेर पडताना दिसत आहेत. अशात कुटुंबाची जबाबदारी, कामाचा ताण, मुलांचे संगोपन यासारख्या अनेक गोष्टींमुळे महिला आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही. तर काही महिला घरी राहून मुलांची, कुटुंबाची काळजी घेताना दिसतात. मात्र स्वत:ची काळजी घ्यायला त्यांना अजिबात वेळ नसतो, ज्याचा परिणाम त्यांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर होतोय. आपण नेहमी पाहतो, महिला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी त्यांच्या आरोग्याविषयी सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण त्या निरोगी राहिल्या तर कुटुंबही निरोगी राहील. वयाच्या 40 वर्षांनंतर महिलांना अनेक आजारांचा धोका असू शकतो, त्यासाठी त्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. विविध आजार टाळण्यासाठी, वेळोवेळी काही चाचण्या कराव्यात, जेणेकरून रोग प्रारंभिक अवस्थेत ओळखता येईल. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ शिराली अरविंद रुणवाल यांनी याबाबत माहिती दिलीय. जाणून घ्या..

 

मॅमोग्राफी चाचणी

महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. त्यासाठी मॅमोग्राफी चाचणी करावी. वयाच्या 40 नंतर ही चाचणी दरवर्षी केली पाहिजे. स्त्रीरोगतज्ज्ञांशी सल्लामसलत करून क्लिनिकल ब्रेस्ट तपासणी केली जाऊ शकते.

 

पॅप स्मीअर चाचणी

महिलांनाही गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. त्याचे स्क्रीनिंग वयाच्या 21 व्या वर्षापासूनच सुरू झाले पाहिजे. मात्र वयाच्या 40 वर्षानंतर असा गंभीर कर्करोग टाळण्यासाठी पॅप स्मीअर चाचणी करणे आवश्यक आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram