Nahur Station Viral Video : मराठीत बोलल्याने रेल्वे कर्मचाऱ्याने तिकीट नाकारलं? नेमकं प्रकरण काय?

Continues below advertisement

Nahur Station Viral Video : मराठीत बोलल्याने रेल्वे कर्मचाऱ्याने तिकीट नाकारलं? नेमकं प्रकरण काय?

मराठीत तिकीट मागितले तर हिंदीतच बोला अशी जबरदस्ती नाहूर रेल्वे स्थानकातील तिकिट खिडकीवरील कर्मचाऱ्यने अमोल माने या प्रवाश्याशी केल्याचा आरोप मराठी एकीकरण समिती ने केला आहे.अमोल माने यांनी नाहूर स्थानकात लोकल चे तिकिट काढण्यास गेले असता तिथल्या कर्मचाऱ्याशी मराठीत बोलू लागले मात्र त्या कर्मचाऱ्याने हिंदीत बोलावे असे अमोल माने यांना सांगितले मात्र मराठीतच बोलणार असा आग्रह माने यांनी केला असता त्या कर्मचाऱ्याने उद्धट बोलण्यास सुरुवात केली. याचा व्हिडिओ माने यांनी मोबाईल मध्ये काढण्यास सुरुवात केली. त्यानतंर त्यांनी या कर्मचाऱ्याची रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार ही केली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई ची मागणी मराठी एकीकरण समिती ने केली आहे. 

ही बातमी पण वाचा

एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीला 236 जागा मिळाल्या आहेत तर महाविकास आघाडीला 49 जागांवर समाधान मानावे लागले आहे.  शिवसेना शिंदे गटाने 57 जागांवर विजय मिळवला असून गत कार्यकाळात शिवसेनेत (Shivsena) झालेल्या बंडानंतर जेवढे आमदार एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) गेले होते, त्यापेक्षा जास्त आमदार आता विजयी झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे 20 आमदार निवडून आले आहेत. गतवेळी झालेल्या शिवसेनेतील बंडातून मोठा धडा घेत उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) आमदारांची बैठक बोलावण्यात आली. त्यांच्याकडून पाठींब्याबाबतची प्रतिज्ञापत्र लिहून खबरदारी घेण्यात आली. आता एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील प्रत्येक पाऊल जबाबदारीने टाकले जात आहे. 
 
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शिंदेंनीही आपल्या आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतली आहेत. पक्षात मुख्यनेते यांचा निर्णय अंतिम राहणार असून या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असणार आहेत. पक्षातील सर्व नियम व अटी त्याचबरोबर पक्ष शिस्तीचे पालन केले जाईल, असा आशय या प्रतिज्ञा पत्रात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  

शिंदेंकडून विशेष खबरदारी?

ताज लँड्स येथे झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी गट नेता म्हणून एकमताने एकनाथ शिंदेंची निवड करत सर्व अधिकार एकनाथ शिंदेंकडे सोपवले आहेत. मात्र तरीही शिंदेंकडून आमदारांची प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आली आहेत. भविष्यात ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुर्नरावृत्ती होऊ नये, याबाबत ही खबरदारी घेतली जात आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शिवसेना बंडाच्या केंद्रस्थानी राहिलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील आता सध्या प्रत्येक पाऊल जबाबदारीने टाकत असल्याचे दिसून येत आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram