Nagpur Winter Session : विधीमंडळात 18 मोर्चे धडकणार, मोर्चांमुळे वाहतूककोंडी होण्याची शक्यता

Continues below advertisement

Nagpur Winter Session : हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस, मोर्चांमुळे वाहतूककोंडी होण्याची शक्यता .. विधीमंडळात 18 मोर्चे धडकणार

आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज विधानभवनात तब्बल 18 मोर्चे धडकणार आहे त्यामुळे आजचा दिवस वाहतूक कोंडी वार ठरण्याची शक्यता आहे. नागपूर यात शेतकरी , महागाई व बेजोगारी यांना घेऊन नाना पटोले यांच्या नेतृत्वात  निघणार काँग्रेसचा मोर्चा व गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात निघणारा धनगर समाजाचा मोर्चा हे लक्षवेधी मोर्चे असणार आहे. यासह गोंडवाना पार्टीचा मोर्चा, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती, समग्र शिक्षा करार श्रमिक संघ, भारत राष्ट्र समिती,शॉपकिपर फेडरेशन, पोलीस बाईज असोसिएशन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण बलुतेदार कारागीर सहकारी संस्था, ग्रामपंचायत संगणक परिचालक,यासह एकूण 18 मोर्चे आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram