Maharashtra Unlock : अनलॉकसंदर्भातील अंतिम मसुदा मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी प्रतिक्षेत, दुपारपर्यंत अधिसूचना मिळेल : विजय वडेट्टीवार

"अनलॉकसंदर्भात अंतिम मसुदा तयार करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे, त्यांची मंजुरी मिळाली की दुपारपर्यंत अधिसूचना निघेल. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार गाईडलाईन्स लागू होतील," अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली. नागपूरमध्ये पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील अनलॉकबाबत केलेल्या घोषणा त्यानंतर राज्य सरकारने दिलेलं स्पष्टीकरण आणि त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी घेतलेला यू टर्न यामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola