नोकरी देताना कोरोना काळातल्या पदव्यांना महत्त्व न देणाऱ्या उद्योगांवर कारवाई : उदय सामंत
कोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री मिळणार असून त्यात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच कोरोना संकटात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डिग्रीकडे कोणीही वेगळ्या किंवा नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये, असा इशाराही उदय सामंत यांनी दिला आहे.