Nagpur Sister Accident : ओव्हरटेक करण्याची चूक नडली भावासोबत परीक्षेला जाताना बहिणीचा मृत्यू

Continues below advertisement

Nagpur Sister Accident : ओव्हरटेक करण्याची चूक नडली भावासोबत परीक्षेला जाताना बहिणीचा मृत्यू

ओव्हटेक करण्याची एक चूक नडली अन् भावासोबत परीक्षेला जाताना बहिणीचा दुर्देवी अंत झालाय. या घटनेनं संपूर्ण  शहर हादरुन गेलंय. मनाला चटका लावणारी ही घटन नागपुरात घडलीये. नेमका हा अपघात कसा घडला? अपघतात चूक कुणाची होती? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत.

चूक नडली घात झाला 

अपघातात मरण पावलेल्या या तुरुणीचं नावय प्रियंका मानकर, ती 26 वर्षांची होती. प्रियंका बँकिंग परीक्षेची तयारी करीत होती. 3 ऑगस्ट रोजी तिची परीक्षा असल्यांन ती आपला भाऊ योगेश आवारेसोबत परीक्षा केंद्रावर जात होती. बेसा परिसरातील संचेती शाळेत तिचं परीक्षा केंद्र होतं. दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास मनीषनगरमधून बेसाकडे जाताना योगेशने पुढे जात असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान समोरून एक बोलेरो गाडी येत होती आले. योगेशची भंबेरी उडाली. निघण्याचा कोणताही मार्ग नसल्याने योगेशने जोरात ब्रेक दाबला.  त्यात योगेशचा गाडीवरील ताबा सुटला. गाडीसह दोघं खाली पडले. अन् प्रियंका ट्रकच्या चाकाखाली सापडली. जागीच प्रियंकाचा मृत्यू झाला. तर योगेश थोडक्यात बचावला. सुदैवाने योगेशनं हेल्मेट घातलेलं होतं. मात्र या अपघातात योगेश गंभीर जखमी झाला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram