Nagpur RTO Transfer Racket : बदलीसाठी आरटीओ कार्यालयात रॅकेट, SIT चौकशी होणार
Nagpur RTO Transfer Racket : बदलीसाठी आरटीओ कार्यालयात रॅकेट, SIT चौकशी होणार
परिवहन विभागामध्ये बदली संदर्भातले रॅकेट कार्यरत आहे का? आणि त्यामध्ये काही निवृत्त अधिकारी मध्यस्थाची भूमिका बजावत आहे का? याचा तपास आता नागपूर पोलिसांची खास एसआयटी (विशेष तपास पथक) करणार आहे... दोन दिवसांपूर्वी नागपुरात परिवहन विभागातील बदल्या संदर्भात दोन परिवहन निरीक्षकांच्या फोन कॉल संदर्भातली एक ऑडिओ क्लिप वायरल झाली होती.. या ऑडिओ क्लिप मध्ये खाडे नावाचे निवृत्त परिवहन अधिकारी नागपुरात आले असून त्यांनी नागपूर सह आजूबाजूच्या जिल्ह्यातील बदलीस पात्र असलेल्या सर्व परिवहन अधिकाऱ्यांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावल्याचं संभाषण होते.. ही ऑडिओ क्लिप समाज माध्यमातून वायरल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्यासंदर्भात एसआयटी ची स्थापना केली आहे.