ABP News

Nagpur Raipur Highway : महामार्गावरील रस्ता दुर्घटनेचे कारण? रस्त्याचा मलबा कोसळला

Continues below advertisement

Nagpur Raipur Highway : महामार्गावरील रस्ता दुर्घटनेचे कारण? रस्त्याचा मलबा कोसळला

नागपूर ते रायपूरकडे जाणाऱ्या भंडारा शहराजवळील भिलेवाडा ते पलाडी दरम्यान असलेल्या पुलाजवळील रस्त्याखालील मातीचं भरण (मलबा) कोसळतोय. यामुळं या राष्ट्रीय महामार्गावर हा रस्ता कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भंडारा येथून लाखनीकडं जाणाऱ्या महामार्गावरील पलाडी गावाजवळ एक नाला वाहतो आणि या नाल्यावर आता मोठ्या पुलाची निर्मिती होत आहे. या नाल्यातून वाहणरं पाणी आणि काल झालेल्या अतिवृष्टीमुळं या रस्त्याच्या खाली भरण भरलेली माती भुसभुशीत झाल्यानं ती कोसळायला लागलेली आहे. या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक आणि अन्य असे हजारो वाहन रोज धावतात. त्यामुळं या ठिकाणी रस्ता कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram