Population | लॉकडाऊनमुळे लोकसंख्या वाढण्याची शक्यता, फाऊंडेशन फॉर रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ सर्विसेसचं भाकित
लॉकडाऊनमुळे देशाच्या लोकसंख्येवर परिणाम होऊ शकतो असा एक अभ्यास समोर आला आहे. महिलांमध्ये सुरक्षित बाळंतपणासाठी जगातील अनेक विकसनशील देशांमध्ये काम करणाऱ्या 'फाऊंडेशन फॉर रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ सर्व्हिसेस' या संस्थेने हा अभ्यास केला. लॉकडाऊनमुळे येणाऱ्या काही महिन्यात देशाची लोकसंख्या लाखोंनी वाढू शकते, असं भाकित व्यक्त करण्यात आले आहे. शिवाय असुरक्षित गर्भपात आणि त्यामुळे माता मृत्यूदर ही वाढू शकेल अशी भीतीही व्यक्त केली आहे.