Nagpur : नागपुरच्या डबल डेकर पुुलाचं काम निकृष्ट दर्जाचं? गर्डरच्या लिफ्टींग होलमधून वाळूची गळती

Continues below advertisement

नागपूरमधील मेट्रोच्या इंदोरा परिसरात निर्मणाधीन डबल डेकर उड्डाणपुलाच्या गर्डरच्या लिफ्टींग होलमधून वाळूची गळती होत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय . गड्डीगोदाम ते ऑटोमोटिव्ह चौक दरम्यान हा डबल डेकर उड्डाणपूल सध्या बांधला जात आहे. या घटनेमुळे हा पूल कमकुवत तर नाही ना असा संभ्रम सध्या नागरिकांच्या मनात निर्माण झालाय. मात्र अधिकाऱ्यांच्या मते लॉंचिंग गर्डर क्रेनने ने वर उचलण्यासाठी त्यामध्ये छिद्र करण्यात येते. त्यातून वाळूची गळती होत असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अशा गळतीमुळे  उड्डाणपुलाच्या खालून जाणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय.त्यामुळे मेट्रोचे कंत्राटदार पूलाखालून जाणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतायत का असा प्रश्न निर्माण होतोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram