Nagpur Mutton Shops Dhulivandan 2025 : नागपुरात धुळवडीनिमित्त मटनाच्या दुकानांत मोठ्या रांगा
Mutton shops Holi: आज धुळवडीचा सण असल्यामुळे खवय्यांकडून मांसाहारावर ताव मारला जाणार आहे. त्यामुळे मुंबई आणि नागपूरमध्ये सकाळपासूनच मटणाच्या दुकानांबाहेर रांगा.
आज धुळवळीचा दिवस त्यात शुक्रवार आल्यामुळे चिकन आणि मटणावर ताव मारणाऱ्या खवय्याने चिकन मटणाच्या दुकानांच्या बाहेर रांगा लावल्या आहेत.
मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी चिकन मटण दुकानाच्या बाहेर अर्ध्या किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत.
महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांची वाढलेली संख्या पाहता सध्या मटणाचा भाव 780 रुपये किलो झाला आहे तरी देखील नागरिक रांगा लावून मटण खरेदी करताना दिसून येत आहेत.
धुळवळीचा सण म्हटला की अनेक मुंबईकर घरी मटणाचा बेत करतात. त्यामुळे मुंबईतील अनेक मटन शॉप च्या बाहेर मोठी रांग पाहायला मिळत आहे.
अगदी सकाळपासून मटणाच्या दुकानावर ही रांग लागली आहे. सकाळी मटन घेऊन धुळवड खेळून मटणावर ताव मारण्याचा प्लॅन मुंबईकरांनी आखलेला दिसतोय.
मुंबईत मटणाचा भाव 840 रुपये किलो तर नागपूरमध्ये मटणाचा प्रतिकिलो भाव 880 रुपये इतका आहे.
गर्दीमुळे अनेकांना पहाटेच बाजारात जाणून मटणाची खरेदी केली आहे.
धुळवडीमुळे नागपूरात मटणाच्या दुकानांत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
आपला नंबर येण्यासाठी ग्राहकाला दोन ते तीन तासापर्यंत वाट पाहावी लागत आहे.
धुळवडीमुळे मागणी वाढल्याने मटणाच्या दरात वाढ झाली आहे.
नागपूरच्या रामेश्वरी भागातील एका मटन शॉपबाहेर ग्राहकांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत.