Nagpur Loksabha 2024 : नागपूर मतदारसंघात कोण मारणार बाजी? अशी आहेत राजकीय समीकरणे! ABP Majha

Continues below advertisement

नागपूर…. विदर्भातील प्रमुख मतदारसंघापैकी महत्वाचा मतदारसंघ… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि दीक्षाभूमी असे दोन प्रमुख वैचारिक केंद्र म्हणजे नागपूर…आधी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा…पण 2014 नंतर देशात झालेले राजकीय परिवर्तन त्यात गडकरींनी बाजी मारली..  2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा तब्बल 2,16,000 मतांनी पराभव केला होता. आता पुन्हा नितीन गडकरी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्याविरोधात काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिलीये.. आजच्या या व्हिडिओतून आपण नागपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत…

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram