Nagpur Hanuman Jayanti : टेकडी रोड हनुमान मंदिरात दीड ते दोन लाख भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन
कोरोनाच्या संकटानंतर यंदा दोन वर्षांनी हनुमान जयंती उत्साहात साजरी होतेय. हनुमान जयंती उत्सानिमित्त नागपुरातील टेकडी रोड हनुमान मंदीरात भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय. या मंदिरात आज रात्रीपर्यंत दीड ते दोन लाख भाविक महाप्रसादाचा आस्वाद घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोजकांनी महाप्रसाद बनवण्यासाठी दहा हजार किलोहून अधिकचं साहित्य वापरून महाप्रसाद तयार केला आहे.