Eknath Khadse | एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?, नागपुरात शरद पवार, उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता | ABP Majha
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं बोलंलं जात आहे. सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तिथेच आहेत. काही वेळापूर्वी भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे नागपुरात दाखल झाले असून ते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून नाराज असलेले खडसे आता भाजपला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत आहेत.