Nagpur Crime : पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या, पोलिसांनी फोडलं बिंग

Continues below advertisement

Nagpur Crime : पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या, पोलिसांनी फोडलं बिंग

पोटच्या मुलाने आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना, कपिल नगर पोलीस ठाण्यांतर्गत खसाळा कॅम्पसमध्ये घडली.. लीलाधर डाखोडे आणि अरुणा डाखोडे अशी मृत आई वडिलांची नावे असून.. आरोपी हा त्यांचाच मुलगा उत्कर्ष डाखोडे आहे... उत्कर्षने २६ डिसेंबरला आईची हत्या केल्यानंतर , बाहेरून घरी आलेल्या वडिलांनाही चाकूने भोसकले.. गेल्या ६ वर्षांपासून इंजिनिअरींगचा अभ्यास करणाऱ्या उत्कर्षला यश येत नव्हतं.. म्हणून आई वडिलांनी त्याला शेती करण्याचा सल्ला दिला होता.. पण एमडी ड्रग्जच्या आहारी गेलेल्या उत्कर्षने, रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं.. आई-वडिलांनी स्वत:चं जीवन संपवल्याचा बनाव रचला होता, पण पोलीस तपासामध्ये मुलाचं बिंग फुटलं..

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram