Nagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रण
Nagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रण
महायुतीच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला असून येत्या 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्रिपदाचं नाव अद्याप जाहीर केलं नसलं तरीही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हे आता जवळपास निश्चित झालं आहे.
मुंबईतील आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्यासाठीचा भव्य दिव्य मंच आणि जय्यत तयारी करण्यात आली आहे. आझाद मैदानावरती 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी साधारणतः 30 ते 40 हजार लोक अपेक्षित आहेत. त्या अनुषंगाने आझाद मैदानात एकुण 3 स्टेज असणार आहे. दरम्यान या शपतविधी सोहळ्यासाठी देशभरातली दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी नागपुरातील एक 'चहावाला' या शपतविधी सोहळ्यासाठी विशेष उपस्थित असणार आहे.