Sanket Bawankuleबिलवर कुठेही बीफचा उल्लेख नाही,संकेतनं भरलेलं बिल 'माझा'च्या प्रतिनिधीनं पाहिलं
Continues below advertisement
Nagpur Sanket Bawankule : बिलवर कुठेही बीफचा उल्लेख नाही,संकेतनं भरलेलं बिल 'माझा'च्या प्रतिनिधीनं पाहिलं
नागपूरमधील ऑडी कार अपघात प्रकरणावरून संजय राऊतांनी एक आरोप केला होता. संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांनी बारमध्ये बीफ अर्थात गोवंशाचं मास खाल्ल्याचा आरोप राऊतांनी केला होता. मात्र तो चुकीचा असल्याचं उघड झालंय. त्या दिवशी बारमध्ये झालेलं साडे तीन हजारांचं बिल पोलिसांनी जप्त केलंय. त्यात बीफ असा उल्लेख कुठेही नाहीये. एबीपी माझाच्या प्रतिनिधीनं ते बिल स्वतः पाहिलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा बीफ कटलेट संदर्भातला दावा राजकीय खळबळ मजवण्याच्या उद्दिष्टाने केला होता का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Continues below advertisement