Nagpur : आपली बस सेवेतील सर्व कंडक्टर पगार झाला नसल्यामुळे संपावर : ABP Majha


नागपूर महापालिकेच्या आपली बस सेवेतील सर्व कंडक्टर सकाळपासून संपावर गेलेत. पगार झाला नसल्याने सर्व कंडक्टर्सनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. आपली बसचा मुख्य डेपो असलेल्या मोरभवनमध्ये सर्व कंडक्टर्स एकत्र आले असून कामावर जाण्यास ते तयार नाहीत. त्यामुळे शहर परिवहन सेवेतील आपली बसची वाहतूक खोळंबलीय. युनिटी सिक्युरिटी फोर्स या खासगी कंपनीकडे आपली बससाठी कंडक्टर नेमण्याची आणि त्यांच्या पगाराची जबाबदारी आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola