Nagpur : Anil Deshmukh यांच्या घरी, मालमत्तांवर छापे, सात तासांपासून चौकशी सुरूच
Continues below advertisement
मुंबई : सीबीआय, ईडीनंतर आता आयकर विभागाच्या रडारवरही राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आले आहेत. अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर आज इन्कम टॅक्स (Income Tax) विभागाने छापेमारी केली आहे. नागपुरातील त्यांच्या मालमत्तेवर इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकला आहे.
अनिल देशमुखांच्या काटोल येथील घरी, ट्रॅव्होटेल हॉटेलसह नागपूर जिल्ह्यातील सहा ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. मुंबईतल्या सुखदा आणि ज्ञानेश्वरी या निवासस्थानीही आयकर विभागाकडून चौकशी सुरु आहे. अनिल देशमुख आणि कुटुंबियांच्या नावे असलेल्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून झालेल्या पैशांच्या व्यवहारांबाबत माहिती घेतली जातेय. मुंबई, पुणे आणि नागपुरातील घरी आणि मालमत्तांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे.
Continues below advertisement