N D Patil passes away : समाजहित डोळ्यासमोर ठेऊन आयुष्यभर कार्य केलं: Sambhaji Raje : Kolhapur

Continues below advertisement

N. D. Patil Passed Away : महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 

वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती. त्यामुळे एन.डी. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र या वयातही एन. डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र यावेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांचे अनेक प्रश्न त्यांनी सातत्यानं मांडले होते. तसेच अनेक प्रश्न त्यांनी मार्गीही लावले होते. 

प्रा. एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च  केलं. 15 जुलै 1929 रोजी सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला होता. नारायण ज्ञानदेव पाटील असे त्यांचे पूर्ण नाव असून 15 जुलै 1929 ला सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथे शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केलं होतं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram