Sharad Pawar Satyacha Morcha : बनावट आधारचा डेमो केला रोहित पवारांवरच गुन्हा दाखल झाला

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बनावट आधार कार्डचा (Fake Aadhaar) डेमो दिल्यानंतर त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाल्याने नवा वाद पेटला आहे. 'ज्यांनी बनावट आधारचा आरोप डेमो दाखवून सिद्ध केला, त्याच्यावरच गुन्हा दाखल केला जातो, याचा अर्थ शासन या सगळ्याला संरक्षण देत आहे,' असा थेट हल्लाबोल रोहित पवार यांनी केला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या नावे बनावट आधार कार्ड तयार करून दाखवल्याप्रकरणी भाजपने (BJP) केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मात्र, आपण मतदार यादीतील त्रुटी उघड केल्या असून, हा लोकशाही टिकवण्यासाठीचा (Save Democracy) लढा आहे, असे पवार यांनी म्हटले आहे. कितीही गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola