Shivaji Park Food Supply : शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी येणाऱ्या शिवसैनिकांसाठी अन्न वाटप

शिवसेनेतील फुटीनंतर आज ठाकरे आणि शिंदे गटाच्या मेळाव्यांकडे राज्याचं लक्ष लागलंय.... शिवाजी पार्क मैदानासाठी संघर्ष करणाऱ्या ठाकरेंना अखेर कोर्टात जाऊन मेळाव्यासाठी मैदान मिळवावं लागलं. त्यानंतर शिंदे यांच्या कडव्या आव्हानासमोर यावर्षी शिवाजी पार्कवरचा मेळावा ऐतिहासिक करण्याचं मोठं आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आहे. शिवसेनेच्या स्थापनेआधीपासून याच मैदानात सुरु झालेली दसरा मेळाव्याची परंपरा यावर्षीही कायम राखण्यात ठाकरेंना यश आलंय. पण बंडानंतर शिंदे यांनी बीकेसी मैदानात आव्हान दिल्यानं यावर्षी एकाच वेळी दोन मेळावे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे टीकेचे कोणते बाण सोडणार आणि शिवसेनेला कोणती नवी दिशा दाखवणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola