MVA Wardha Pattren :मतदारसंघासाठी देवाण-घेवाण, महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यता

Continues below advertisement

MVA Wardha Pattren :मतदारसंघासाठी देवाण-घेवाण,  महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यता

महाविकास आघाडीत होईल वर्धा पॅटर्नची पुनरावृत्ती!!! मविआच्या जागा वाटपात मतदारसंघ एका पक्षाकडे आणि सक्षम उमेदवार दुसऱ्या पक्षाकडे असल्यास मविआ करेल उमेदवारांची देवाण-घेवाण!!!  विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी वर्धा पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे... लोकसभा निवडणुकीच्या वेळेला अनापेक्षितरित्या वर्धा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात आला होता.. मात्र सक्षम उमेदवार नसल्यामुळे ऐनवेळी शरद पवार गटाने काँग्रेस नेते अमर काळे यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली होती... त्याच यशस्वी वर्धा पॅटर्नची पुनरावृत्ती राज्यात अनेक ठिकाणी होऊ शकते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शेखर सावरबांधे यांनी दिली आहे..   महाविकस आघाडीत तीन पक्ष एकत्रित असताना मतदारसंघांची देवाण-घेवाण होईलच सोबतच उमेदवारांचा मेरिट ही महत्त्वाचा ठरेल... असे होत असताना काही मतदारसंघात अशी स्थिती येईल की मतदारसंघ एका पक्षाकडे जाईल आणि तगडा उमेदवार दुसऱ्या पक्षाकडे असेल.. अशा वेळेस वर्धा पॅटर्न प्रमाणे मविआच्या अंतर्गत मित्र पक्षांमध्ये उमेदवारांची देवाणघेवाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सावरबांधे म्हणाले... संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती पाहायला मिळू शकते.. दरम्यान, वर्धा पॅटर्न नागपूरमध्ये राबवला जाईल की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही असे ही ते म्हणाले..... मात्र इतर अनेक मतदारसंघांमध्ये ही तो राबवला जाऊ शकतो...   मविआ ला जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे असतील, तर उमेदवार आणि पक्ष दोघांनाही त्याग करावा लागेल... आणि असे होत असताना उमेदवारांची देवाण-घेवाणीचा वर्धा पॅटर्न महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अमलात आणलं जाऊ शकतं असे सावरबांधे म्हणाले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram