MVA Vidhansabha Seat Sharing : मविआचा जागावाटपाचा प्रश्न गणेशेत्सवानंतरच सुटणार

Continues below advertisement

MVA Vidhansabha Seat Sharing : मविआचा जागावाटपाचा प्रश्न गणेशेत्सवानंतरच सुटणार

महाविकास आघाडीच्या जागावाटप संदर्भातील संयुक्त बैठका आता गणेशोत्सवानंतर होणार, मुंबईच्या रखडलेल्या जागावाटपसंदर्भात आता गणेशोत्सवानंतर निर्णय होणार  महाविकास आघाडीच्या  जागावाटपसंदर्भातील  दोन बैठका झाल्यानंतर आता पुढील बैठका या गणेशोत्सवानंतर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे,   गणेशोत्सव झाल्यानंतर  सुरुवातीला मुंबईतील जागावाटपा संदर्भात निर्णय घेतला जाणार असून त्यानंतर कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रातील जागा वाटप बाबत निर्णय घेतला जाणार आहे    महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठका जरी गणेशोत्सवानंतर होणार असल्या तरी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षांच्या अंतर्गत बैठका या यादरम्यान होत राहतील, त्यासोबत प्रचाराची रणनीती सुद्धा ठरवतील    ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्ष पक्षांतर्गत सर्वे, जागा वाटपापूर्वी पक्षाकडून तयार करण्यात आलेले अहवाल, महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील कोणत्या विधानसभा मतदारसंघात आपली ताकद आहे,शिवाय कोणते इच्छुक उमेदवार आहेत, कोणत्या जागा संदर्भात आपण आग्रही  असले पाहिजे,या सगळ्या बाबत पक्षांतर्गत चर्चा करतील अशी माहिती देण्यात आली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram