Bhai Jagtap Congress : काँग्रेस ठाकरेंशिवाय लढणार? भाई जगतापांच्या विधानाने खळबळ

Continues below advertisement
काँग्रेसचे नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी आगामी मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीसंदर्भात केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) खळबळ उडाली आहे. 'राज ठाकरे (Raj Thackeray) तर सोडाच, आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही (Uddhav Thackeray) मुंबई महापालिकेत लढणार नाही,' असं खळबळजनक वक्तव्य भाई जगताप यांनी केलं आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पक्षातील अनेक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा सूर काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात असाच आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, हा आपला वैयक्तिक आणि कार्यकर्त्यांच्या भावनेचा आवाज असून, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असंही जगताप यांनी नमूद केलं आहे. त्यामुळे आता काँग्रेस हायकमांड यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola