MVA Seat Sharing : मविआ जागावाटप सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळणार

Continues below advertisement

MVA Seat Sharing : मविआ जागावाटप सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळणार 

गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु असल्याने महाविकास आघाडीत काहीसा तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मविआतील ज्येष्ठ नेत्यांनी चर्चेचा सूत्रं हाती घेत मविआचे गाडे पुन्हा रुळावर आणले आहे. काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे मविआत (MVA seat Sharing) तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे आता काँग्रेसने अनुभवी नेतृत्व असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे चर्चेच सूत्रं सोपवली होती. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मंगळवारी सकाळी मुंबईत येत प्रथम शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले.   बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. या फॉर्म्युलानुसार, काँग्रेस पक्ष 110 जागांवर लढणार होता. यापैकी 5 जागा चर्चेअंती कमी जास्त होण्याची शक्यता आहे. तर ठाकरे पक्ष 90 जागांवर लढणार होता. यामध्येही काही बदल होण्याची शक्यता आहे. त्यांच्या पाच जागा कमी होऊ शकतात. तर शरद पवार गट 75 जागांवर लढणार होता. मात्र, आता तडजोड करण्यासाठी हा जागांचा आकडा वरखाली होण्याची शक्यता आहे.   हे जागावाटप करताना मविआच्या मित्रपक्षांचाही विचार करण्यात आला आहे. या जागांचे वाटप झाल्यानंतर समाजवादी पक्षाला सामावून घेण्यासंदर्भात निर्णय होईल, असे सांगितले जाते. आज दुपारी मविआच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठक पार पडेल. यानंतर ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram