MVA Rift: ‘सन्मान दिला तरच आघाडी, अन्यथा आम्ही सक्षम’, राष्ट्रवादीचे Salil Deshmukh यांचा Congress ला इशारा
Continues below advertisement
नागपूर जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (MVA) फूट पडल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते सलिल देशमुख (Salil Deshmukh) आणि काँग्रेसमधील (Congress) नेत्यांमध्ये जागावाटपावरून मतभेद निर्माण झाले आहेत. 'आमच्या कार्यकर्त्यांचा संघटनेचा योग्य मानसन्मान काँग्रेस ठेवणार असेल तरच आम्ही काँग्रेससोबत आघाडी करू अन्यथा आम्ही सक्षम आहोत,' असा थेट इशारा राष्ट्रवादीचे नेते सलिल देशमुख यांनी दिला आहे. देशमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने अद्याप आघाडीविषयी कोणतीही चर्चा सुरू न केल्याने राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना आणि इतर समविचारी पक्षांशी बोलणी सुरू केली आहेत. दुसरीकडे, काँग्रेस नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांनी एकदाच फोन करून चर्चेचे आश्वासन दिल्याची माहिती आहे. जागावाटपावर अद्याप कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही, याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील (Pravin Kunte Patil) यांनीही दुजोरा दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement