Zero Hour : स्थानिक निवडणुकीआधी महाविकास आघाडीत फूट?

Continues below advertisement
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Elections) तोंडावर महाविकास आघाडीमध्ये (MVA) बिघाडी होण्याची चिन्हं दिसत आहेत. काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) आणि सचिन सावंत (Sachin Sawant) यांच्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 'आम्ही मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतही लढणार नाही', असं स्पष्ट विधान काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केलं आहे. दुसरीकडे, जोपर्यंत बिहारची निवडणूक (Bihar Elections) होत नाही, तोपर्यंत स्थानिक निवडणुकांच्या आघाडीवर कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असंही काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपला (BJP) रोखण्यासाठी इंडिया आघाडीच्या (INDIA bloc) धर्तीवर एकत्र लढण्याची इच्छा व्यक्त होत असली तरी, काँग्रेसमधील एक गट स्वबळावर लढण्यासाठी आग्रही असल्याचं चित्र आहे. सचिन सावंत यांच्या मते, स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात आणि राष्ट्रीय पातळीवरील आघाड्यांमुळे त्यांना संधी मिळत नाही, त्यामुळे स्वतंत्र लढण्याचा विचार नवीन नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola