MVA : मविआचा हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया मोर्चा, मविआच्या आंदोलनाला महायुतीचं आंदोलनातून उत्तर
MVA Protest : मविआचा हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया मोर्चा, मविआच्या आंदोलनाला महायुतीचं आंदोलनातून उत्तर
मालवणमधला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितलीय. तरीही महाविकास आघाडी आजच्या आंदोलनावर ठाम आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून माफी मागितल्याचा आरोप ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी केलाय. मविआ आज मुंबईत सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहे. आधी हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. आणि त्यानंतर गेटवे ऑफ इंडियावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान या आंदोलनाला पोलिसांची अजून परवानगी मिळालेली नाहीय..तर मविआच्या आंदोलनाला महायुती आंदोलनातूनच उत्तर देणार आहेत.. मविआच्या निषेधार्थ महायुतीने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली