MVA Protest : मविआच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद
MVA Protest : मविआच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद
मालवणमधला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मविआ आज जोडे मारो आंदोलन करणार आहे... दरम्यान पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितलीय. मात्र तरीही महाविकास आघाडी आजच्या आंदोलनावर ठाम आहे. मविआ आज मुंबईत सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहे. आधी हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. आणि त्यानंतर गेटवे ऑफ इंडियावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या
पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ
इंडिया पर्यटकांसाठी सकाळी 10 वाजल्यापासून बंद राहणार आहे
दरम्यान या आंदोलनाला पोलिसांची अजून परवानगी मिळालेली नाहीय..मात्र तरी आज मविआच्या आंदोलनाला महायुती आंदोलनातूनच उत्तर देणार आहे.. मविआच्या निषेधार्थ महायुतीने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली