MVA Protest For Onion : डोक्यावर कांद्याची टोपली, गळ्यात माळ, घोषणाबाजी...विरोधक आक्रमक

Continues below advertisement

MVA Protest For Onion : डोक्यावर कांद्याची टोपली, गळ्यात माळ, घोषणाबाजी...विरोधक आक्रमक

नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे, लासलगाव बाजार समितीत आज लिलाव झालेत मात्र शनिवारीपेक्षा कमी भाव मिळाल्याचं शेतकरी सांगत आहेत, कांद्याला भाव मिळावा म्हणून आंदोलन झाले मात्र भाव अधिकच पडलेले आहेत, सरासरी साडेचारशे रुपये भाव मिळत असून मजुरी, उत्पादन खर्च, दळणवळण खर्चही भरून निघत नसल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे, सरकारने लक्ष घालावे, अनुदान द्यावे अशी मागणी बळीराजा आजही करतोय, सोमवारी याच मागणीसाठी लासलालगाव बाजार समितीचे लिलाव बंद ठेवण्यात आले होते. भाव तेजीत आले नाही मात्र कालची आणि आजची अशी एकत्रित आवक येत असल्याने कांद्याचे भाव आणखी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे, साधारपणे 300 ते 700 रुपये असा सरासरी साडेचारशे पाचशे रुपये भाव मिळत असल्याच शेतकऱ्यांचा दावा आहे. सरकारने लक्ष घालावे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतोय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram