Mumbai Satyacha Morcha : मतचोरीविरोधात विरोधकांचा एल्गार;प्रविण दरेकरांचा घणाघात
Continues below advertisement
मुंबईत महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) यांनी एकत्र येत मतदार यादीतील घोळाच्या विरोधात 'सत्याचा मोर्चा' काढला आहे. या मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या मोर्चावर सडकून टीका केली आहे. 'लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु ही नवतंकी आहे, कारण त्यांना काहीतरी नरेटिव सेट करायचं आहे,' अशा शब्दांत दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे, मोर्च्याच्या ठिकाणी 'उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान' आणि 'राज ठाकरे भावी मुख्यमंत्री' असे होर्डिंग्ज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मतदार याद्यांमधील चुका दुरुस्त करण्याची प्रक्रिया नैसर्गिक असून, त्यासाठी रस्त्यावर उतरून लोकांना संभ्रमित करण्याची गरज नाही, असेही दरेकर म्हणाले. हा मोर्चा म्हणजे लोकांच्या प्रश्नांवरून लक्ष हटवून केवळ राजकीय फायदा मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement