Voter List Scam: मतदार याद्यांवरून घमासान, मविआ-मनसेचा 'सत्याचा मोर्चा'.

Continues below advertisement
बनावट मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) आक्रमक झाली असून, त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात 'सत्याचा मोर्चा' आयोजित केला आहे. जोपर्यंत मतदार याद्यांमधील बोगस नावे वगळली जात नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी MNS प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. आज होणाऱ्या या मोर्चाला पोलीस परवानगी नाकारण्याची शक्यता असतानाही, MVA आणि MNS मोर्चावर ठाम आहेत. दुसरीकडे, बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयविरोधी भूमिकेमुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे. त्यामुळे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार वगळता इतर मोठे नेते मोर्चापासून दूर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे गट मतदार यादी दुरुस्तीसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola