Voter List Morcha: मतचोरीविरोधी मोर्चात काँग्रेसचे मोजकेच नेते सहभागी होणार
Continues below advertisement
महाविकास आघाडी (MVA) आणि मनसेने (MNS) निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून मोर्चा काढला आहे. या मोर्चात ठाकरे बंधू, राज आणि उद्धव ठाकरे, एकत्र आले आहेत, तर दुसरीकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. 'राज ठाकरेंनी हिंसक गोष्टी सुरु केल्या आहेत, त्यामुळे राज ठाकरेला अटक झाली पाहिजे', अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. जोपर्यंत मतदार याद्यांमधील चुका दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. धुळे मतदार यादीत तब्बल ४५,००० बोगस नावे आणि ११,००० मृत मतदारांच्या नावावर मतदान झाल्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी उघड केले आहे. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजप (BJP) मूक आंदोलन करणार आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या सहभागामुळे आणि बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने (Congress) या मोर्चापासून सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement