Pune MNS Karykarte : पुण्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्याच्या मोर्चासाठी रवाना
Continues below advertisement
मुंबईत मतदार यादीतील (Voter List) कथित घोळाविरोधात महाविकास आघाडी (MVA) आणि मनसेने (MNS) 'सत्याचा मोर्चा' आयोजित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) नेते प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी 'नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस मतदार याद्या मॅनेज करून निवडणुका जिंकण्याचा खोटा डाव आखत आहेत,' असा गंभीर आरोप केला आहे. हा मोर्चा म्हणजे हुकूमशाहीच्या विरोधात निवडणूक आयोगाला दिलेला इशारा असून, भविष्यात राज्यात आणि देशात चक्काजाम करण्याचा इशाराही त्यांनी दिला. हा लढा पक्ष वाचवण्यासाठी नसून लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आहे, असेही आंदोलकांनी स्पष्ट केले. आंदोलकांच्या दाव्यानुसार, एजन्सी पैसे घेऊन मतदार संघात नवीन नावे समाविष्ट करत आहेत, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement