Maharashtra Politics : राज ठाकरेंमुळे निवडणूक अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीला सपकाळांची दांडी?

Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांसोबत निवडणूक आयोगाची (Election Commission) भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ (Harshwardhan Sakpal) यांनी काही दिवसांपूर्वीच 'महाविकास आघाडीत नवा भिडू नको' असे वक्तव्य केले होते. मात्र, दिल्लीतील बैठकीमुळे या शिष्टमंडळात सहभागी होऊ शकलो नाही, असे स्पष्टीकरण सकपाळ यांनी दिले आहे. सकपाळ यांनी नंतर 'संविधान रक्षणासाठी कुणी सोबत येत असेल तर आम्ही विचार करू' अशी भूमिका घेतल्याने त्यांच्या भूमिकेत बदल झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीला राज ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेही उपस्थित होते, जिथे मतदार याद्यांमधील त्रुटींचा मुद्दा उचलण्यात आला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola