Election Comminssion : मविआ-मनसे एकत्र, निवडणूक आयोगाच्या भेटीला
Continues below advertisement
महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) यांचे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम (S. Chockalingam) यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार या प्रमुख नेत्यांचा समावेश असेल. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शकपणे पार पडाव्यात आणि मतदार याद्यांमधील गोंधळ दूर व्हावा, या प्रमुख मागण्यांसाठी ही भेट होणार आहे. 'निवडणूक आयोगाची भेट घेणे ही एक औपचारिकता आहे, कारण ते काहीही करत नाहीत,' असे वक्तव्य शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी केले आहे. असे असले तरी, लोकशाही प्रणालीतील ही एक सर्वोच्च संस्था असल्याने त्यांच्यासमोर मुद्दे मांडणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिष्टमंडळात काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि इतर पक्षांचे नेतेही सहभागी होणार आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement