MVA - Mahayuti Loksabha Election : मविआ, महायुतीसमोर समोर काही जागांचा पेच

Continues below advertisement

MVA - Mahayuti Loksabha Election : मविआ, महायुतीसमोर समोर काही जागांचा पेच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काही जागांचा अजूनही तिढा आहे. मात्र त्यापेक्षाही गंभीर प्रश्न महायुती आणि महाविकास आघाडी यांना अनेक मतदारसंघात तुल्यबळ उमेदावर मिळत नाहीयेत. शिवसेना ठाकरे गटाचा कल्याण, हातकणंगले, उत्तर मुंबई, या तीन मतदारसंघात उमेदवार निश्चित झालेला नाही, तर शिवसेना शिंदे गटाचा ठाणे, उत्तर पश्चिम मुंबई, संभाजीनगर, यवतमाळ वाशिम, दक्षिण मुंबई, नाशिक या मतदारसंघात  उमेदवार निश्चित झालेला नाही. तर भाजप उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, संभाजीनगर इथे अडचण सतावतेय. काँग्रेसने उत्तर मध्य मुंबई, जालना या मतदारसंघात अजून निश्चित उमेदवार मिळेला नाही. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमर धाराशिवची डोकेदुखी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासमोर माढा, सातारा, बीड, रावेर, भिवंडी या मतदारसंघात उमेदवार मिळालेला नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram